विश्वसुंदरी ऐश्वर्या राय म्हटले की 1994 मधला तो सोहळा आठवतो. जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये जिच्या नावाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. ऐश्वर्याच्या नावाची चर्चा जेवढी तिच्या सौंदर्यासाठी आणि कामासाठी झाली तेवढीच चर्चा तिच्या नातेसंबंधांबाबतही झाली. लग्नानंतर ऐश्वर्याने ‘जज्बा’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पुनरागमन केले. या सिनेमानंतर ऐश्वर्याने ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ हे दोन सिनेमे केले. ऐश्वर्याने ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमात साकारलेली नंदिनी आणि ‘देवदास’मधली पारो या व्यक्तिरेखा आजही कोणी विसरू शकलेले नाही. पण तुम्हाला माहित आहे का, सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिला आर्किटेक व्हायची इच्छा होती. ऐश्वर्याने जेव्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले होते, तेव्हा तिच्या सौंदर्याबद्दल मथळेच्या मथळे छापून यायचे. तिचे आगामी सिनेमे, तिची आवड प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांची इच्छा असायची. आपल्याबद्दल छापून येणारी प्रत्येक कात्रणं जपून ठेवण्याचा ऐश्वर्याला छंद होता. जेव्हा ऐश्वर्याचा सिनेमांशी दूर-दूरपर्यंत काहीही संबंध नव्हता तेव्हा तिचे निळे डोळे आर्किटेट व्हायची स्वप्न पाहत होती. पण अचानक मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या आणि तिच्या नशिबाने पाहता पाहता कलाटणी घेतली. ऐश्वर्याने 9 वीत असताना कॅमलिन पेन्सिलच्या एका जाहिरातीत सर्वप्रथम काम केले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews